नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत काल दिवसभरात मोठी घसरण झाल्यानंतर आज आशियाई बाजारपेठेत तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यानं वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 6 पूर्णांक 6 दशांश टक्के वाढ होऊन, ते 36 अमेरिकी डॉलर प्रति बॅरल इतकं झालं आहे.
तेलाच्या उत्पादनावरुन सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धाचे परिणाम कच्या ते लाच्या किंमतीवर दिसून येत आहेत. 1991 मधे झालेल्या आखाती युद्धानंतर प्रथमच कच्या तेलाच्या दरात एवढी मोठी घसरण झाली आहे.