नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयाने एस बँकेचा संस्थापक राणा कपूरची सक्त वसुली संचालनालयाची कोठडी या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत वाढवली आहे. काल त्याला न्यायाधीश पी. पी राजवैद्य यांच्यासमोर उपस्थित केले होते.
राणा याने ३० हजार कोटींचे कर्ज वेगवेवेगळ्या कंपन्यांना दिले होते, त्यापैकी २० हजार कोटींचे कर्ज बुडीत खात्यात परावर्तित झाले, असा युक्तिवाद सक्त वसुली संचालनालयातर्फे केला गेला. त्यामुळे अधिक चौकशीसाठी संचालनालयाने राणाच्या कोठडीची मुदत वाढवून मागितली होती. ती मुदत न्यायालयाने मान्य केली. गेल्या रविवारी राणाला अटक केली होती.