मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुंबई, नागपूर आणि पुणे इथेच कोरोना संशियांच्या नमून्यांची तपासणी होत असल्यानं गर्दी होत आहे. त्यामुळे तपासणी केंद्र वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं.

औरंगाबादला विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणं होत असल्यानं, तिथेही कोरोना तपासणी केंद्र उभारण्याचा मुद्दा पवार यांनी मांडला.

दरम्यान अजूनही देशाबाहेर अडकलेल्या आणि मायदेशात परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या परतीसंदर्भात मार्गदर्शनासाठी एक कक्ष स्थापन करण्याची सूचनाही विधासभेच्या अनेक सदस्यांनी केली.