नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे य़ांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर, राजकीय पक्षांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्याची विनंती, औरंगाबाद पोलिसांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आज शिवजयंतीसाठी औरंगाबाद इथे आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होणार आहेत.