नवी दिल्ली : “आर्थिक धोरण भविष्यातील वाटचाल” या विषयावर नीती आयोगाने आयोजित केलेल्या 40 अर्थतज्ञ आणि इतर तज्ञांच्या बैठकीला पंतप्रधानांनी आज हजेरी लावली.
सत्रा दरम्यान अर्थतज्ञ आणि विविध विषयांवरील तज्ञांनी स्थूल अर्थव्यवस्था आणि रोजगार, कृषी, जलस्त्रोत , निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर आपली मते पाच मुख्य समूहाद्वारे मांडलीत.
पंतप्रधानांनी सहभागी तज्ञांचे अर्थशास्त्र विषयावरील त्यांच्या सूचना आणि निरीक्षणासाठी आभार मानलेत.
या बैठकीला पियुष गोयल इंद्रजीत सिंग उपस्थित होते. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजकुमार आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी ही या बैठकीला उपस्थित होते.