नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकसंख्या सुची अद्यायावत करताना कोणत्याही नागरिकाला डी अथवा संशयास्पद असा शेरा दिला जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. या दरम्यान, कोणत्याही नागरिकाला प्रत्येक माहिती देणे बंधंन कारक नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दिल्ली हिंसाचारांवर संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. सहा महिन्याच्या आत ही सुची अद्यायावत करायची आहे. पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून ही सुची अद्यायावत करण्याच काम  सुरु होणाऱ आहे. २०१० मध्ये हे सर्वेक्षण झाले होते.