मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. आठ आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश न्यायालयानं शासनाला दिले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांची त्रिसदस्य समिती संस्थांनाचं कामकाज पाहणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आघाडी सरकारच्या काळात साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणूक झाल्या होत्या. या संदर्भात शिर्डी इथले सामाजिक कार्यकर्ते उत्तम रभाजी शेळके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नियुक्त केलेलं विश्वस्त मंडळ हे संस्थानाच्या घटनेनुसार नसल्याचा दावा त्यांनी या याचिकेत केला होता.