नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत त्या बोलत होत्या.

भारतातील परकीय थेट गुंतवणूक आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक विदेशी गुंतवणुकदारांना अधिक आकर्षक वाटत असल्याने  बर्‍याच  विदेशी कंपन्या  त्यांचं उत्पादन एकक चीन मधून बाहेर हलवण्याच्या विचारात आहेत, असं त्या म्हणाल्या. विदेशी गुंतवणुकदारांना भारत हा गुंतवणुकीसाठी योग्य ठिकाण आहे असं वाटतं. असं त्या म्हणाल्या.