नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात आजपासून प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली.

विशेष उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढत पेट्रोलसाठी प्रतिलिटर आठ रुपये, तर डिझेलवरचं प्रतिलिटर चार रुपये झालं आहे.

तसंच पेट्रोल आणि डिझेलवरचा पथकर प्रतिलिटर एका रुपयानं वाढून दहा रुपये झाला आहे.