नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीर प्रशासनानं शेर ए- काश्मीर वैद्यकीय शास्त्र संस्थेत,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सौरा इथे चाचणी प्रयोग शाळा सुरु केली आहे. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये दक्षता पथक नेमण्यात आले आहेत.
२४ तास सुरू असणारे अतिउच्च दर्जाचे नियंत्रण कक्ष सर्व जिल्ह्यात उभारले आहेत. दरम्यान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आर्थिक विभागाचे आयुक्त अटल डुल्लु यांनी जम्मू-काश्मीरमधल्या सर्व रुग्णालयांना भेट देऊन या संदर्भात संबंधित रुग्णालयांनी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.