मुंबई (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये अडकून पडलेल्या २१८ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मिलानहून मायदेशी परतले.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितले, की या सर्व प्रवाशांना दोन आठवडे छावला इथल्या इंडो-तिबेट सीमा पोलीस छावणीतल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
संकटात सापडलेल्या भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या विशेष उड्डाणासाठी त्यांनी एअर इंडियाचं कौतुक केले असून, इटली सरकारचेही आभार मानले आहेत.