नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशन या संघटनांनी १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारचे सिनेमा, दूरचित्रवाणी कार्यक्रम, जाहिराती, वेब सिरीजचे चित्रकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या तीन्ही संघटनांच्या आज झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला.