नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये पहिला क्रिकेट सामना खेळला गेला होता.

हा अमर्यादित चालणारा कसोटी सामना होता. म्हणजेच आजच्या सारखे या कसोटी सामन्याला ५ दिवसांची मर्यादा नव्हती. दोन्ही संघांना दोन-दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आणि सर्व फलंदाज बाद होईपर्यंत त्यांना खेळता येणार होते.

क्रिकेटच्या खेळामध्ये इंग्लंड अनुभवी मानला जात असला तरी या पहिल्याच अधिकृत सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नवोदित खेळाडूंनी त्यांना ४५ धावांनी पराभूत केले होते.