नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार असून गुरुवारपासून येस बँकेच्या देशभरातल्या सर्व शाखांमधून कामकाज सुरु होईल, असं येस बँकेनं म्हटलं आहे. ग्राहकांना सर्व डिजिटल सेवांचा ही पूर्ववत लाभ घेता येणार आहे.
येस बँकेवर येत्या २६ मार्च पासून नवीन संचालक मंडळ येईल, अशी माहिती रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज दिली.
दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी २० मार्च पर्यंत वाढविण्याचा आदेश मुंबईतल्या विशेष न्यायालयानं दिला आहे.