नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोरोना बाधितांना सामावून घेण्यासाठी, एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं आपल्या ११ इमारती, मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द केल्या आहेत.
या इमारतींमध्ये २ हजार ८० खोल्या असून त्यांचा उपयोग विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल अशी माहिती, एस आर ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी आज दिली.