नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं सध्या सुरू असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. रद्द केलेल्या परीक्षा ३१ मार्चनंतर घेतल्या जातील, असं यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

त्यासोबतच ईशान्य दिल्लीतल्या विद्यार्थ्यांसाठी याआधी बदललेलं वेळापत्रकही पुन्हा बदललं जाणार आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या महिनाअखेरपर्यंत या परीक्षांच्या नव्या तारखा घोषित केल्या जातील.

दरम्यान भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने मात्र नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील असं म्हटलं आहे. तर आयसीएसई शिक्षण मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या नसल्याचं मंडळाच्या सचिवांनी काल स्पष्ट केलं.