नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात ही चाचणी सुरू झाली असून हाफकिन संस्था आणि पुण्याच्या बी.जे. रुग्णालयातही एक-दोन दिवसात या चाचण्या सुरू करण्याची सोय होईल, अशी माहिती त्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना दिली.
याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्याची मुभा खासगी प्रयोगशाळांना दिली आहे. मात्र ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं असतील त्यांनीच खासगी प्रयोगशाळांमधून या चाचण्या करून घ्यावात, असं आवाहन त्यांनी केलं