नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते.

ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे, त्यांची थकीत रक्कम सरकारच्या नियमानुसार दिली जाईल. तसेच कंत्राटदारांची देणीही चुकती केली जातील जेणेकरुन त्यांना कत्राटी कामागाराचे वेतन देता येईल, असे ते म्हणाले.