नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरिहंत मॅट्रेसेसचे मालकांनी 13 मार्चच्या एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात “arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडियातो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden’ Za Furniture Kasheli ( Furniture Market)Bhiwandi” या मथळयाखाली जाहिरात दिलीहोती. या मॅट्रेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असेसांगून जनतेची दिशाभूल करणारी आणि अफवा निर्माण करणारी जाहिरात प्रसिध्द केली.
त्यामुळेहा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानाच्या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे भादविकलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५२ सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती)अधिनियम १९५४ कलम ३,४,५ अन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.
खारबावचे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी सर्जेराव डावखर यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई केली.