नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सवलतीत कर्ज देण्याच्या योजनेची घोषणा आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केली होती. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख कोटींहून अधिक कर्जांचं वितरण करण्यात आलं आहे.

याचा लाभ ३० लाखाहून अधिक उद्योगांना झाला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सुमारे ५८ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातल्या सुमारे २ लाख ४० हजार व्यावसायिकांना झाला आहे.

या व्यावसायिकांना सव्वा सहा हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ७८ हजार व्यावसायिकांच्या खात्यात सुमारे पावणे तीन हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.