नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय आय टी मद्रासनं तयार केलेल्या प्रोग्रामिंग आणि डाटा सायन्स या पदवी अभ्यासक्रमांचं उद्घाटन मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आज केलं. हा अभ्यासक्रम ऑनलाइन चालविला जाणार आहे.

गणित आणि शास्त्र घेवून बारावी उत्तीर्ण असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येईल, तसंच बारावीचे परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. याशिवाय पदवीधर तसंच व्यावसायिकांनाही हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

सध्या देशात कुठल्याही विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या क्षेत्रात येत्या ५ वर्षात साडेअकरा दशलक्ष रोजगार निर्मितीची शक्यता आहे, असं रमेश पोखरियाल निशंक यांनी यावेळी बोलताना सांगितलं.