नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन माता वैष्णौदेवी यात्रा स्थगित झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जम्मू-कश्मीर सरकारच्या सूचनेनुसार यात्रा थांबवण्यात आली आहे.
यात्रेकरुंनी वैष्णौदेवीला जायची योजना आखू नये, असंही सांगण्यात आलं आहे. मात्र, वैष्णौदेवी मंदिरात पूजा-अर्चा, आरती आणि पारंपारिक दिनचर्या सुरुच राहणार आहेत.