नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची आशा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने रोख्यांची अमर्याद खरेदी करण्याची केलेली घोषणा या आधारावर देशातले शेअर बाजार आज तेजीत होते.

सकाळच्या व्यवहारात घसरलेले भारतीय बाजार सकाळी साडे दहानंतर तेजीने वर आले. एकेक्षणी सेन्सेक्स अकराशेहून अधिक अंकांनी वधारला होता तर निफ्टीमध्येही १८०हून अधिक अंकांनी वधारला होता. काल वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यांच्यामध्ये आज मोठी सुधारणा दिसून आली.

आशियायी शेअर बाजारसुद्धा आज तेजीत होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सेन्सेक्स ६००हून अधिक अंकांनी वधारून २६ हजार ५०० अंकांच्या पुढे गेला होता तर निफ्टी दीडशेहून अधिक अंकांनी वधारून ७ हजार ७०० अंकांच्या पुढे गेला होता.