मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १६५ रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ३७ हजार ७५५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६० लाख ८ हजार ७५० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३० हजार ९१८ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ९४ हजार ७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३३ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ९ शतांश टक्के आहे. मुंबईत काल बुधवारी दिवसभरात तब्बल ५६० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवलं. आतापर्यंत ७ लाख ८ हजार २१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ३२ हजार ३४९ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ९७ दिवसांवर आलाय. सध्या ६ हजार २० रुग्ण उपचार घेत आहेत. काल १३ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण  मृतांचा आकडा १५ हजार ७३९ वर पोचला आहे. जळगाव जिल्ह्यात काल ११ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ६ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या १०९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार १०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल २ नवीन रुग्ण आढळले. सध्या १३ रुग्ण उपचार घेत आहेत.परभणी जिल्ह्यात काल ७ रूग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात ४ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या ८९ रुग्ण उपचाराधीन आहेत.नांदेड जिल्ह्यात काल १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात १४ नवीन रुग्ण आढळले. सध्या ६८ रुग्ण उपचार घेत आहेत. काल जिल्ह्यात एक रुग्ण दगावला.वाशिम जिल्ह्यात काल ८ रुग्ण या आजारातून बरे झाले. काल ४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. सध्या ५७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सिंधुदुर्गात काल ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, काल २२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १२८  वर पोचली आहे. कोरोनामुळे काल एकूण सात जणांचा मृत्यू झाला,