नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दळणवळणाची गैरसोय लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याचे निर्देश शासनानं एसटी महामंडळ आणि बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतल्या बोरिवली, वाशी, दादर याठिकाणी जाण्यासाठी दर ५ मिनिटाला एसटीच्या बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तिथून पुढच्या प्रवासासाठी बेस्टच्या बस उपलब्ध आहेत.
पश्चिम रेल्वेनं प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद केली असलं तरी अन्य आवश्यक सेवांसाठी रेल्वेची सुविधा सुरूच आहे. रेल्वेच्या वाघिणींमध्ये पूर्वी सामान चढवणं अथवा उतरवण्यासाठी जर वेळ लागला तर दंड भरावा लागत असे, हा दंड आता माफ करण्यात आला आहे. अत्यावश्यक सामानांच्या वाहतुकीसाठी एकूण १३० डब्यांची सोय रेल्वे तर्फे करण्यात आली आहे. दूध, पेट्रोलियम पदार्थ, अन्नधान्य, कोळसा आदी अत्यावश्यक गोष्टींसाठी रेल्वेनं ही विशेष सुविधा केली आहे.