नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रिपोर्टिंग दरम्यान मिडिया रिपोर्टर यांनी घ्यायची खबरदारी –
(१) कमीतकमी 5 फूट अंतरावरुन लोकांशी बोला आणि मास्कशिवाय लोकांमध्ये जाऊ नका,
(२) दुचाकी किंवा कारमधून उतरण्यापूर्वी, सॅनिटायझरने संपूर्ण हात आपल्या मनगटाच्या पुढे स्वच्छ करा,
(3) जास्त प्रमाणात जमा झालेल्या गर्दीच्या मध्यभागी जाऊ नका,
(4) चालत असताना काही सेकंदांसाठीच लोकांची प्रतिक्रिया घ्या आणि लगेच पुढे जा,
(5) अशा ठिकाणी जाऊ नका, जेथे विनाकारण लोक जमाव करून उभे असतात, अशा ठिकाणी जा, जेथून गर्दीपासून लांब राहून बातम्या देऊ शकला, तसेच आपल्या अवतीभवती जास्त गर्दी होणार नाही,
(6) लाइव्ह किंवा व्हिडिओ बनवताना, वाहन सोडण्यापूर्वी मोबाईल, इअर फोन / बूम आयडी यांच्यावर देखील सॅनिटायझर वापर करा,
(7) लोकांची मुलाखत घेतल्यानंतर लगेचच मोबाईल, ईयरफोन व हात सॅनिटायझर वापर करून पुन्हा स्वच्छ करा. तसेच, स्टीयरिंग, गाडीची चावी, सीट, हँड ब्रेक इत्यादींंना पाण्यामध्ये डेटॉलचा वापर करून, कपड्याने स्वच्छ पुसून काढा,
(8) दुसर्या दिवशी तुम्ही परिधान केलेले कपडे वापरू नका, त्यांना लगेच धुण्यासाठी टाका,
(9) प्रयत्न करा, कुटुंबातील इतर सदस्याद्वारे नव्हे, तर आपण स्वतः वॉशिंग मशीनमध्येच धुवून काढा,
(10) आपण कुठूनही बाहेरुन आलेले असल्यास किंवा कार्यालयातून काम संपवून घरी परत आल्यास, त्यावेळी घराच्या कोणत्याही सदस्याला आणि विशेषत: मुलांना स्पर्श करावा लागणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
(11) बुट व चप्पल घराबाहेरच ठेवा, घराच्या बाहेेेरच हात व पाय धुण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करा.
(12) कोरोनाची मााहिती देताना प्रथम सुरक्षितता महत्त्वाची आहे, तसेच थेेट प्रेक्षपण करताना आपण काय खबरदारी घेतो, हे लोकांना सांगा.
महत्वाची माहिती
संस्थांनी फक्त अशाच कर्मचार्यांना बोलवावे ज्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. संस्थेत अनावश्यकपणे गर्दी करू नका. कर्मचार्यांमध्ये 1 मीटर अंतर असले पाहिजे. स्वच्छतेसाठी सॅनिटायझर वापरायची व्यवस्था करावी.