नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमहामार्ग मंत्री नितीन गडकरी आपलं एक महिन्याचं वेतन पंतप्रधान मदत कक्षाला देणार आहे.

जास्तीत जास्त लोकांनी यासंकटावर मात करण्यासाठी मदत करावी असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही कोरोना उपचार आणि प्रतिबंधासाठी पन्नास लाख रुपये मदत दिली आहे.