नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ उतार झाले आणि दिवस अखेर निर्देशांक १३१ अंकाची घसरण नोंदवत २९ हजार ८१६ अंकांवर बंद झाला.
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज काही उपाय सुचवल्यानंतर सकाळी निर्देशांक वधारून ३१ हजार १२६ अंकांवर पोचला होता. दिवसभरात एकदा तो २९ हजार ३४७ अंकांपर्यंत खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९ अंकांनी वधारून ८ हजार ६६० अंकांवर पोचला.