नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, येत्या ३० जूनपर्यत वाढवावी, आशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याकडे लक्ष वेधून याबाबत तातडीने निर्णय करावा असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.