नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आयुष अंतर्गत, पाच वैद्यकीय शाखांमधल्या तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
या वैद्यकीय शाखांचं जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलं असून, त्याचा यासाठी उपयोग करावा, आयुषचे शास्त्रज्ञ, ICMR, CSIR आणि इतर संशोधन संस्था यांनी एकत्र येऊन पुरावे आणि तथ्यांच्या आधारावर एकत्रित संशोधन करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, देशभरातल्या वैद्यकीय क्षेत्रातलं सेपूर्ण मनुष्यबळ सज्ज असणं ही काळाची गरज आहे,आणि गरज पडली तर,आयुष क्षेत्रातल्या खाजगी डॉक्टरांचीही मदत घेता येईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी,आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.