नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सनं ५ लाख रुपयांची मदत आज पाठवली. फर्मचे संस्थापक तथा संचालक श्री. रतनलाल बाफना यांनी ही मदत रवाना केली. लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातही रोजंदार, निराधार, वृद्ध आदींच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही स्वयंसेवी संस्था अन्न पाकिटे आणि शिधा वाटप करत आहेत. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स संचालित अहिंसातीर्थ गोशाळेतही रोज २५० ते ३०० लोकांसाठी जेवण तयार करुन ते शहरातल्या गरजूंपर्यंत जेवण पोचवलं जात आहे.