नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु असताना जनतेला जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी विभागाच्या वतीनं मालगाड्यांच्या फेऱ्या नियमित होत आहेत.
गेल्या ४ दिवसात जवळपास एक लाख ६ हजार वाघिणींच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तु सर्व राज्यांमध्ये पाठवण्यात येत आहेत. या सेवांवर नियंत्रण आणि निगराणीसाठी एक आपत्कालीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.