नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रात्री गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील नवेझरी इथं एका इसमाची हत्या केली. हिरालाल कल्लो असं मृत इसमाचं नाव असून, ते नवेझरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते.
काही नक्षल्यांनी हिरालाल यांना गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. आज सकाळी गावकऱ्यांना हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाशेजारी नक्षल्यांनी पत्रकही टाकले होते. त्यात हिरालाल पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. हे कृत्य कोरची दलमने केल्याचा अंदाज आ