नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं कोरोना विषाणूविरोधात एकत्रितरित्या देत असलेला लढा याविषयावर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सर्व नवीन आणि व्यावसायिक चित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे. १ मे पर्यंत कलाकृती आयसीसीआरला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.iccr.gov.in या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.