पिंपरी : मोरया सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनापासून मोरया क्लिनिक मोहंननगर येथे आजपासून दिनांक 21 /04/2020 पर्यन्त सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. देशातील कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर जो भारत सरकारने तसेच महाराष्ट्र शासनाने जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मोरया सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा केंद सुरू करण्यात आले आहे. डॉ सरोज अंबिके, डॉ अमित भस्मे, डॉ सुनिल यादव, वैष्णवी अंबिके, हनुमान खटिंग, प्रीतम वाघमारे, प्रणव रणधीर, तसेच मोरया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकलचे विद्यार्थी यावेळी ही सुविधा दररोज दुपारी 1 ते 4 या वेळात देणार आहेत.
याचे सर्व नियोजन डॉ. गणेश मा.अंबिके अध्यक्ष मोरया सामाजिक प्रतिष्ठान यांनी केले आहे. या प्रसंगी स्वप्निल विभूते, वेंकटेश कलाल उपस्थित होते. तरी सर्व नागरिकांनी त्याचं शासकीय नियम पाळून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.