नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 विरुद्धच्या अभियानात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीनं, एनसीसी योगदान अभियानांतर्गत प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे.
एनसीसीचे विद्यार्थी हेल्पलाइन, कॉल सेंटरचे व्यवस्थापन, मदत पुरवठा, औषधं, अन्न, आवश्यक वस्तूंचं वितरण आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यासारख्या उपक्रमात प्रशासनाला मदत करणार आहेत.