नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातले काजू बोंडू खरेदीदार कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत दोडामार्ग तालुक्यात येऊ लागले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं  शेतकऱ्यांनी गोळा केलेले  काजू बोंडू पडून राहिल्यानं खराब होऊ लागले होते. कालपासून गोव्यातले  व्यापारी येऊ लागल्यानं दोडा तालुक्यातल्या काजू बागायतदारांना दिलासा मिळत आहे.

गोव्यात  शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी वास्तव्याला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांची बंदच्या काळात होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना  जीवनावश्यक साहित्य पुरवत आहेत. त्यामुळे या तरुणांना दिलासा मिळाला आहे.