नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र निषेध केला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. कोवीड १९ विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर लढणारे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी आणि इतर कर्मचारी बजावत असलेल्या कामगिरीची लोकानी जाणीव ठेवली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

कसलंही संमेलन किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करु नये, आणि परस्परांमधे सुरक्षित अंतर राखण्यासाठी आपल्या अनुयायांना प्रेरित करावं यासाठी धार्मिक नेत्यांशी संपर्क साधावा, असं आपण सर्व राज्यपाल आणि नायब राज्यपालांना सांगितलय, असंही नायडू यांनी या ट्वीट संदेशात म्हटलंय.