नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या देशातल्या अव्वल खेळाडूंशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.

भारताचा क्रिकेट कर्णधार  विराट कोहली, BCCI अध्यक्ष  सौरव गांगुली, भारतरत्न सचिन तेंडुलकर, महिला हॉकी संघाची कर्णधार रानी  रामपाल, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू  यांच्यासह चाळीस  खेळाडूंशी त्यांनी  संवाद साधला.

सध्याच्या नकारात्मक वातावरणात या खेळाडूंनी देशवासियांना  नैतिक बळ देऊन कोरोना विरोधातल्या लढाईत आपलं योगदान द्यावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी संकल्प, संयम, सकारात्मकता, सन्मान आणि सहयोग या पंचसूत्रीचं पालन करणं महत्वाचं असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.