मुंबई : मध्य रेल्वेने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पार्सल रेल्वे गाड्या  चालवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गोधनी (नागपूर) ते न्यू तिनसुकिया पार्सल रेल्वे गाडी 41 टन फळे, लसूण आणि आले इत्यादींसह देशाच्या पूर्वेकडील भागांसाठी आवश्यक वस्तू पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी  सोडण्यात आली.

कल्याण ते सांकराईल (कोलकाता) पार्सल गाडी दिनांक 2.4.2020 रोजी  औषध आणि वैद्यकीय साहित्य, मास्क, सॅनिटायझर यांसह सोडण्यात आली.  नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, टाटानगर येथे ही गाडी थांबणार असल्याने अधिक पार्सलची वाहतूक  यातून   होणे अपेक्षित आहे.

दिनांक 9.4.2020 रोजी होणा-या आणखी एका प्रवासासाठी  मुंबई भागातील पार्सल लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्या या पार्सल ट्रेनचा लाभ घेऊ शकतात. दुसरी पार्सल ट्रेन कल्याण येथून दिनांक  7.4.2020 रोजी चांगसारी (गुवाहाटी) साठी सुटेल.

00103 पार्सल रेल्वे गाडी कल्याण येथून दिनांक 7.4.2020 रोजी 20.30 वाजता सुटेल व चांगसारी येथे दि. 10.4.2020 रोजी  12.00 वाजता पोहोचेल.  00104 पार्सल रेल्वे गाडी 10.4.2020 रोजी 23.30 वाजता चांगसारी येथून सुटेल आणि कल्याण येथे दि. 13.4.2020 रोजी 20.00 वाजता पोहोचेल.

थांबे : इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, टाटानगर, सांकराईल, भट्टानगर, डानकुनि, मालदा टाऊन, न्यू बोंगाईगाव.

पार्सल ट्रेनचे नियोजन:

पार्सल ट्रेन कल्याण येथून सकाळी 9.00 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे  दुसर्‍या दिवशी १५.४० वाजता पोहोचेल.  परत येताना हजरत निजामुद्दीन येथून 00.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी सकाळी 07.10 वाजता कल्याण येथे  पोहोचेल.

थांबे : इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ.  पक्षकारांनी (पार्टी) मागणी केल्यास अधिक थांबे प्रदान करण्यात येतील.

जर संपूर्ण पार्सल ट्रेन एखाद्या पार्टीद्वारे सुरूवातीच्या  ठिकाणी लोड केली गेली तर  गंतव्यस्थानावर त्वरीत पार्सल  ट्रेन  पोहोचू शकते.  कोणत्याही गंतव्यस्थानासाठी पार्टीकडून पूर्ण पार्सल  ट्रेनची मागणी आल्यास, मध्य रेल्वे सेवा प्रदान करण्यासाठी तत्परतेने कार्य करेल. या सेवा 14.4.2020 रोजी सुरू होणार्‍या प्रवासापर्यंत वैध आहेत.

ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांना या संधीचा उपयोग घेता येईल.