नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४९० वर पोचली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या ५९ रुग्णांना ते उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानं, घरी सोडण्यात आलं आहे, तर आत्तापर्यंत ३४ जण या आजारानं दगावले असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि बाधित रुग्णांना शोधण्यासाठी मुंबई पालिकेनं घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत कोरोनाची लागण झालेल्या १३० रुग्णांचा शोध घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत पालिकेनं आत्तापर्यंत  १५ लाखांहून अधिक नागरिकांचं सर्वेक्षणही केलं आहे.