नागपुर : केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यन्वयन मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी विभाग (क्षेत्र संचालन  विभाग) नागपुर व डेटा गुणवत्ता आश्वासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जून शनिवार रोजी सकाळी 10 वाजता डेटा गुणवत्ता आश्वासन विभाग, सी. जी. ओ. कॉम्प्लेक्स, बी ब्लॉक, सातवा माळा, सेमिनरी हिल्स नागपुर येथे सांख्यिकी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सांख्यिकी दिवसाची संकल्पना “सतत विकास लक्ष्य” अशी आहे.

प्रोफेसर (स्वर्गीय) प्रशांत चन्द्र महालनोबिस यांच्याद्वारे स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या आर्थिक नियोजन व सांख्यिकी विकासात दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्याच्या हेतूने त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी दिवसाच्या स्वरूपात साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. नागपूरात आयोजित कार्यक्रमात गुणवत्ता आश्वासन विभाग, नागपुरचे उपमहासंचालक अनिल पाटिल अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून मुख्य अतिथिच्या स्थानी  शालिनी ए. भोयर, महासंचालक (सेवा निवृत्त), टी. के. बसु, अपर महानिदेशक (सेवा निवृत्त), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे प्रभारी कुसचिव तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे विभागप्रमुख डॉ. विनायक देशपांडे व राष्ट्रीय सांख्यिकी विभाग क्षेत्रीय कार्यालय, नागपुरचे संचालक श्रीनिवास उप्पला, उपस्थित राहणार आहेत.

13 व्या सांख्यिकी दिवसाच्या अनुषंगाने प्रश्नमजुंषा स्पर्धा व शब्दकोडे स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे.