मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरू आहे. एका दिवसात म्हणजेच 6 एप्रिल रोजी 152 गुन्ह्यांची नोंद झाली असून 55 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 38 लाख 39 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यस्तरावर मोठी कारवाई सुरू केली आहे. 24 मार्च 2020 पासून राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशील :
कालावधी | नोंदविण्यात आलेले गुन्हे | अटक आरोपी | जप्त मुद्देमालाची एकूण किंमत |
दि.06-04-2020 | 152 | 55 | रु. 38,39,556/- |
दि.24-03-2020 ते दि.06-04-2020 | 1571 | 596 | रु.3,82,35,014/- |
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. टोल फ्री क्रमांक – 18008333333, व्हाट्सअँप क्रमांक – 8422001133 तर ई-मेल commstateexcise@gmail.com असा आहे.