नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदींचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढविण्यासाठी विविध राज्य सरकारं आणि तज्ञांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळं हा कालावधी वाढविण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र संचारबंदी वाढविण्यासंदर्भात अजून कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.