नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या, भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था, तसेच भारतीय लेखापरीव्यय संस्था या तीनही व्यावसायिक संस्थांनी पुढे येऊन पीएम केअर्स या फंडाला कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी 28 कोटी 80 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे.
28 मार्च 2020 रोजी कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री आपत्कालीन नागरीक सहायता आणि मदत निधी म्हणजेच पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली होती. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपत्तीच्या काळात संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली होती.
याबाबत तपशीलवार माहिती…..…
(रुपये कोटी प्रमाणे)
अनुक्रमांक |
संघटनेचे नाव |
संस्थेचा हिस्सा |
सदस्यांचा हिस्सा |
एकूण |
1 |
भारतीय लेखापरीक्षण संस्था |
15 |
6 |
21 |
2 |
भारतीय कंपनी सचिव संस्था |
5 |
0.25 |
5.25 |
3 |
भारतीय लेखापरीव्यय संस्था |
2.50 |
0.05 |
2.55 |
एकूण |
22.50 |
6.30 |
28.80 |