सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आॉटोरिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करणे.
कोव्हिड-19 महामारीसंदर्भात अफवा तसेच चुकीच्या बातम्या पसरू नयेत यासाठी प्रादेशिक तपास समिती स्थापन करणे.
मुंबई : कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी, केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने प्रादेशिक संपर्क कार्यालय (महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी) सुरू करण्यात आले असून यानुसार, ग्रामीण भागात, प्रत्येक परिसरात, जनजागृती निर्माण करण्यासाठी ऑटोरिक्षांमधून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करण्यात येणार आहे. यासाठी तीनचाकी वाहने तसेच ऑटोरिक्षांमधून ध्वनिमुद्रित प्रचार केला जाईल.
याकरता कोविड-१९ ने बाधित झालेल्या विभागात, प्रचारासाठी दिवसभरात 8 ते 10 तास, 20 वाहने, 50 किलोमीटर अंतरापर्यंत तैनात केली जाणार आहेत.
हा प्रचार परीणामकारक होण्यासाठी ROB कर्मचारी पुणे आणि संगीत-नाट्य विभागाच्या कलाकारांची मदत घेण्यात आली आहे असून स्थानिक भाषेत श्रवणीय संदेश आणि गाणी तयार करण्यात आली आहेत. श्रवणीय संदेशांचे लक्ष्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे हे असून त्या बरोबरीने वैयक्तिक स्वच्छता, लॉकडाऊनच्या कालावधीत घरी राहून करायच्या उपाययोजना, तसेच घराबाहेर पडल्यावर सामाजिक अंतर राखणे, सरकारच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, अफवांचा फैलाव रोखणे, लॉकडाऊनच्या काळात कृषी संदर्भातली माहितीसह अत्यावश्यक सेवांसंदर्भात माहिती पुरविणे तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कोविड-19 रोगाबद्दलच्या संदेशांचा प्रचार केला जाईल.
ध्वनिक्षेपकाद्वारे विविध विभागांतून केलेल्या प्रचारामुळे राज्यातील प्रत्येक भागात कोविड-19 संदर्भात जनजागृती करण्याचे काम पोचविणे यशस्वी होईल, असे मनिष देसाई, व्यवस्थापकीय संचालक माहिती विभाग (पश्चिम क्षेत्र) यांनी म्हटले असून राज्य सरकारच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
याशिवाय ROB पुणे यांच्या वतीने संतोष अजमेरा यांच्या पुढाकाराने, क्षेत्रीय तपास समिती स्थापन केली असून, ती समिती प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीचा शहानिशा करेल आणि अफवा आणि चुकीच्या बातम्यांचा फैलाव रोखण्यासाठी मदत करेल. वस्तुस्थिती पडताळून घटनेची खरी माहिती, नागरिकांना व्हॉट्स अॅप आणि इतर सामाजिक माध्यमातून दिली जाईल आणि अफवांचा फैलाव रोखला जाईल. यासाठी जिल्हा कार्यालयाची मदत घेतली जाईल, तसेच केंद्र सरकारच्या आणि राज्यसरकारच्या संकेतस्थळे आणि वाहिन्यांचा वापर केला जाईल.
प्रादेशिक संपर्क कार्यालय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे कार्यालय असून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी पुणे, हे त्याचे (प्रादेशिक) प्रमुख केंद्र आहे. भारत सरकारच्या प्रसार आणि संपर्क कार्यासाठी राज्यात दहा उपकार्यालये असून ती पुणे कार्यालया अंतर्गत आहेत.
- ध्वनिवर्धक लावलेले विशिष्ट ऑटोरिक्षा टेंपो, तीनचाकी वाहने ग्रामीण भागात फिरतील.
- पंतप्रधानांचा संदेश, मुख्यमंत्र्यांचा संदेश, कोविड-19 महामारी संदर्भात ध्वनिमुद्रित केलेली ROB पुणे आणि दूरदर्शन कर्मचाऱ्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, तसेच सामाजिक अंतर राखणे, क्रुषी संदर्भात करायच्या/टाळण्याच्या गोष्टींची माहिती
- 14 एप्रिल 2020 पर्यंत, दररोज 8 ते 10 तास, 50 किलोमीटर अंतर कापणारी, 87 आणि राज्यभरात 5600 किलोमीटर प्रवास करणारी वाहने.
- दिशादर्शक सोय असलेली, नेमके स्थान सांगणारी वाहने.