नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं, केरळमधल्या श्री चित्रा तिरुनल वैद्यदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारासाठी बऱ्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा वापरायच्या पद्धतीला परवानगी दिली आहे.
या पद्धतीत बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये कोविड१९ विरोधात विकसित झालेली रोगप्रतिकार क्षमता वापरली जाते. याकरता बऱ्या झालेल्या रुग्णातल्या अँटीबॉडीज बाधित रुग्णात सोडल्या जातात.