नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीएमआरच्या वतीने देशाला कोरोना विषाणूशी संबंधित अद्ययावत माहिती देताना डॉ. मनोज मुराहेकर म्हणाले की, ’40 हून अधिक लसींवर काम सुरू आहे, परंतु अद्याप कोणीही पुढच्या टप्प्यात पोहोचलेले नाही. भारतदेखील या प्रयत्नात गुंतलेला आहे.
डॉ. मनोज मुराहेकर म्हणाले की, देशात कोरोना तपासणीसाठी 219 लॅब आहेत. एकूण 1 लाख 86 हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून दररोज सरासरी 15 हजार नमुन्यांची तपासणी केली जात असून, सरासरी 584 प्रकरणे सकारात्मक आढळली आहेत.