नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या, राज्यातल्या स्थलांतरीत मजूरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला सांगितलं. याबाबत दाखल झालेल्या दोन याचिकांची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर के देशपांडे यांनी ही सूचना केली असल्याचं वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.

या मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं तर प्रशासनावरचा ताणही कमी होईल, असं ते म्हणाले. मात्र गावी परतण्याची परवानगी देण्याआधी, त्यांना कोरोना संसर्ग झाला नसल्याची खातरजमा करुन घेण्यासाठी त्यांची चाचणी करावी, असं त्यांनी सांगितलं. त्यावर, स्थलांतरीत आणि रोजंदारी मजुरांच्या प्रश्नांचं निवारण करण्यासाठी नेमलेली राज्यस्तरीय समिती न्यायालयाच्या या सूचनेवर विचार करेल, असं महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितलं.