पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून गर्दी होणार नाही यासाठी पोलिस विषेश खबरदारी घेत आहेत. अशात २४ तास दक्ष असणाऱ्या पोलीस बांधवांना कोरोनाची लागण होण्याचा मोठा धोका आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने, संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटनिस विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मदतकार्य सुरू आहे. याच धर्तीवर कोव्हिड १९ या महाभयंकर आजारापासून काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार तसेच पोलिस उपनिरिक्षक अपर्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटाझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. समीर पठाण, जेष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आंबेगावचे मार्गदर्शक जितेंद्र जोशी, विकास गाडे, संपर्क प्रमुख भानुदास बोऱ्हाडे, सिताराम काळे, मोसीन काठेवाडी, विजय साळवे, कॅप्टन धनंजय कोकणे, विलास काळे, सुनील काळे, अक्षय गाढवे, ऋषिकेश खानदेशे, अक्षय इंदोरे आदि उपस्थीत होते.